त्या वळणावर

दिवस सुरु होतांना सर्वांनाचं आशा असते काहीतरी नवीन घडण्याची. चांगलं वाईट हा विचार नंतर, पण काहीतरी घडणार हे नक्की. कधीकधी घाल घडलेल्या घडामोडींचा परिणाम तर, कधी नवीन घटना, दिवसाची सुरुवात ही अशीचं येते मात्र काहीच्या आयुष्यात येणारा दिवस तोचतोपणा आणतो आणि आयुष्य विसर वाटु लागतं. असंच घडत होत शलाकाच्या आयुष्यात तिला हवं होत नवीन आयुष्य मात्र नवीन आयुष्य कोणालाचं मिळत नाही, मात्र जुन बदलण्याची संधी प्रत्येकालाचं मिळते. फक्त ती संधी ओळखण्याची कुवत फार कमी जणांकडे असते.

Comments